top of page

टीमटीमत्या दिव्यातही सामर्थ्य असतं, अंधाराशी झुंजून प्रकाश किरण पसरवण्याचं

जुळलं __रावांशी नातं, पुढच्या सात जन्माचं.

 

 

IPhone 5 ला competitor Samsung Galaxy 4 आला

काय सांगू राव! __हिला बघून कलेजा खलास झाला.  

 

 

मावळत्या सूर्याला खात्री असतेच दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाची

नाव घेते __रावांचं, त्यांची सहचारिणी मी जन्मभराची.

 

 

पावसाची सर येताच अंकुरतो जीव मातीत

काय सांगु किती गोडवा..! __रावांच्या वाणीत.

 

 

उंच आकाशात झेपावणाऱ्या पक्षाला ओढ असतेच घरट्याची

संध्याकाळ झाली कि लागते मला चाहूल, रावांच्या घरी परतण्याची

/(हौसे भारी मला __रावांचे नाव घेण्याची)

 

गौराई

bottom of page